




अपामार्ग
गण: शिरोविरेचन कृमिघ्न वमनोपग ( चरक ) अर्कादी (सुश्रुत)
कुल: अपामार्ग
नाम: Latin name: Achyranthes aspera
संस्कृत: अपामार्ग (दोष संशोधक), शिखरी(पुष्प शिखरतुल्य मंजिरी समान ) ,खरमंजरी (पुष्पमंजरी खर असल्यामुळे ) , मयुरक अध:शल्य ( अधोमुख कंटक) ,प्रत्येकपुष्पा ( अधोमुखपुष्प ) , आघाट
हिंदी : चिडचिडी, चीचडा चीरचीट पंजाबी : पुठ्कंदा मराठी : आघाडा गुजराथी : अघेडो तेलगु :अपामार्ग उतरेन
कन्नड : उतरेन मल्याळम: कटलती english : prickly chaff flower
स्वरूप: याचे १ ते ३ फूट उंचीचे क्षुप असते कांड सरळ आणि शाखायुक्त असते . शाखा पर्वावर जाड असते .
पत्र: अंडाकार किंवा अभीलटवाकर लम्बाग्र १ ते ५ इंच लांब रोमश
पुष्पमंजिरी : १ फुट लांब खर दृढ अग्रभागी स्थूल आणी खाली वाकलेली असते ज्यातून अधोमुख १/६ -१/४
लांब पुष्प लागतात
वृंतपत्रक : लटवाकर गुलाबी रंगाचे काटेदार प्राय: काट्या पेक्षा निम्म्या किंवा बरोबरीचे असतात ;
फलीय परीपुष्प : १ ते २ इंच लांब हिरव्या वर्णाचे गुलाबी आभा वाले असतात
पुंकेषर पाच असतात कान्ताकीय वृंत पत्रक व तीक्षांग्र असल्यामुळे ते कपड्यांना चिकटतात . पक्व फळातून तांदळाच्या दाण्यासमान दाने निघतात म्हणून त्यास अपामार्गतन्दुल म्हणतात हिवाळ्यात फुले आणि फळे लागतात ग्रीष्मात फळ गळून पडतात
जाती : श्वेत आणि रक्त
गुण: लघु, रुक्ष तीक्ष्ण रस: कटू तिक्त विपाक: कटू वीर्य : उष्ण
reference:1:http://malherbologie.cirad.fr/Adventrop/especes/a/acyac/acyac_d.jpg pic 1:
2: http://ts-den.aluka.org/fsi/img/size2/alukaplant/pre/phase_01/pre0001/presld0009491.jpg
3: http://www.impgc.com/images/PlantPictures/Achyranthes%20aspera.jpg
4. http://malherbologie.cirad.fr/Advenrun/especes/a/acyas/acyas_75.jpg
5: http://dravyagunatvpm.files.wordpress.com/2009/01/achyranthes-aspera-apamarga-3.jpg
6: द्रव्यगुन विज्ञान (प्रियव्रत शर्मा )


