Thursday, January 12, 2012

किंशुक (पलाश)

क्षारश्रेष्ठ: कृमिघ्नश्च संग्राही दीपन: पर:! प्लीहगुल्मग्रहन्यर्शोवातश्लेष्मविनाशन:!
किषुकस्यापि कुसुम सुगन्धि मधुरं च तत् ! बीजं तु कटुकं स्निग्धमुषणम् कृमिबलसजित !
(धन्वंतरी निघ्नटू)

नाम : ब्युटिया मोनोस्पर्मा (butea monosperma)
कुल : शिम्बी कुल ( लेग्यू मिनोसी - leguminosae )
उपकुल : अपराजिता -उपकुल ( पैपिलिओनिटी-papilionatae )
संस्कृत : पलाश ,किंशुक , रक्तपुष्पक , क्षारश्रेष्ठ, ब्रम्हवृक्ष , समिद्वर
पलाश - पत्र प्रधान या मांसवत रक्तवर्ण पुष्प
किंशुक - शुकतुंडा समान फुले
याला ब्रम्ह वृक्ष असेही म्हटले जाते .
यज्ञा मध्ये उपयोग असल्यामुळे यास समीद्वर असेही म्हणतात
हिंदी: ढाक टेसु , मराठी : पळस ,
गुज : खाखरी (वृक्ष ) केसुडा (पुष्प ) पालाशपापडा ( बीज )
तमिळ: परास तेलगु : मोदुग ,कन्नड :मुत्तुग मल्याळम: पालाशीन समत
flame of the forest, parrot tree म्हणून हि ओळखले जाते

स्वरूप : याचे ४०-५० फुट वाढणारे वृक्ष असतात .
पत्र त्रीपत्रक स्वरुपात असतात


पुष्प मंजिरी : अर्धा फुट लांब ज्यात चमकणारे नारंगी लाल फुले भरपूर संख्येने असतात .ते पाने नसलेल्या फांद्यावर लागतात.




वसंत ऋतू मध्ये फुले ग्रीष्मात फळ लागते .उन्हाळ्यात त्वचेवर कापल्यावर निर्यास निघतो ,लाल रंगाचा गोंद होतो यास ब्यूटिया गम किंवा बंगाल कायानो
असेही म्हणतात .
याच्या मुळापासून सूत्र तर फुला पासून रंग प्राप्त करतात प्राचीन काळी होळी साठी याच्या फुलांपासून रंग बनवत
उत्पती स्थान : भारत
रासायनिक संघटन : kinotannic acid -त्वक आणि निर्यास मध्ये
palosonin: बी मध्ये सापडते गन्डू पद कृमीवर प्रभावी
गुण : लघु , रुक्ष रस : कटू , तिक्त ,कषाय
विपाक : कटू
वीर्य : उष्ण
उपयोग : पलाशो दीपनो वृष्य: सरोष्णो व्रणगुल्मजीत । भग्नसंधान कृद्दोष ग्रहण्यर्श: कृमिन् हरेत ॥
कषाय: कटुकस्तिक्त: स्निग्धो गुदजरोगजित । तत्पुष्पं स्वादु पाके तु कटु तिक्तं कषायकम ॥
वातलं कफपितास्र कृच्छजित ग्राही शीतलम । तृड् दाह शमनं वातरक्तकुष्ठहरं परम् ॥
फलं लघु उषणं मेदार्श: कृमिवात कफापहम । विपाके कटुकं रूक्षं कुष्ठगुल्मोदर प्रनुत ॥

भाव प्रकाश


प्रयोज्य अंग : त्वक ,पुष्प , निर्यास ,बीज
विशिष्ट योग : पलाश बिजादी चूर्ण , पलाशक्षार घृत

संदर्भ : द्रव्यगुण विज्ञान ( प्रियव्रत शर्मा)

No comments:

Post a Comment