this article is published this year 2012 in swasthyadip e-ayurved diwali magazine www.sukhswasthya.com
त्याचा वेलु गेला गगनावेरी -मोगरा फुलला मोगरा फुलला ।
![]() |
| mogara flower |
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥
मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥
रचना --- संत ज्ञानेश्वर
संगीत --- पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर --- लता मंगेशकर
गाणे ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
आयुर्वेद संहिता मध्ये 'जाती ' या नावाने वर्णन आले आहे .जातीचे शास्त्रीय नाव jasmin officinale linn.forma grandiflorum आहे, कुल पारिजात (oleaceae ) आहे . संस्कृत मध्ये जातीला काही पर्यायी नावे वर्णन केली आहेत सौमनास्यायनी/ सुमना म्हणजेच मनाला प्रसन्न करणारी चेतनेला प्रफुल्लीत करणारी चेतिका तर सुंदर गंध असणारी ती हृदगंधा. हिंदी मध्ये चमेली, असे म्हणतात इंग्लिश मध्ये common jasmine असे नाव आहे . जातीच्या निसर्गामध्ये २०० species आढळतात . तर मराठी गुजराथीत चबेला म्हणतात .हाच तो मोगरा मराठीतील Jasminum sambac ही त्याची species आहे. संस्कृत मध्ये यास मल्लिका ,मालती असेही म्हणतात मुदगर या शब्दाचा अपभ्रंश होऊन मोगरा हा शब्द तयार झाला असावा . मोगर्याची फुले सुवासिक असल्यामुळे स्त्रियांच्या विशेष आवडीची असतात. मोगरा हा प्रत्येकाच्या परस बागेत असतोच. नेहमी केसांत माळला जाणारा आणि देवाला वाहिला जाणारा तो मोतिया मोगरा . हा मोत्या प्रमाणे दिसतो म्हणून यास मुक्ताभा असेही म्हणतात. याव्यतिरिक्त मोगरीचे हजारी मोगरा ,लांबट पाकळ्यांचा बेला मोगरा ,मुंग्रा असे प्रकार आहेत .मुंग्राच्या कळ्या एक एक इंच मोठ्या बघावयास मिळतात. एकावर एक पाकळ्यांचे थर असलेला झुबकेदार मोगरा तो बटमोगरा( वृत्त मल्लिका ) या नावाने. भ्रमरोस्तवा म्हणून हि मोगार्यास ओळखले जाते त्याच्या भोवती भ्रमारांची फिरस्ती असते म्हणूनच . वार्षिकी आणि ग्रैष्मी असे दोन प्रकार मोगरा फुलण्याच्या काळावरून पडतात.पावसाळ्यात वर्षा ऋतूत फुलतो तो वार्षिकी मोगरा तर उन्हाळ्यात ग्रीष्म ऋतूत फुलणारा ग्रैष्मी मोगरा होय .
फिलिपिन्स देशाचे राष्ट्रीय फुल मोगरा आहे इंडोनेशिया देशाच्या राष्ट्रीय ३ फुलां पैकी एक मोगरा हे फुल आहे.चीन मध्ये jasmine tea मध्ये फुलांचा वापर करतात .भारतात अत्तर बनवण्यासाठी व औषधी म्हणून उपयोग करतात .
याचे औषधी उपयोग वर्णन करण्यात आले आहेत.
1) मोगर्याची याची पाने मुख रोग नाशक म्हणून वापरतात .दात दुखणे किंवा दातात बल नसणे यात पाने चावून खातात .चमेलीच्या मुळा चा उपयोग उटण्या मध्ये केला तर किंवा स्वतंत्र वापरल्यास त्वचेचा वर्ण सुधारतो.
2) काही घरां मध्ये उन्हाळ्यात माठाच्या पाण्यामध्ये वाळ्या सोबत मोगर्याची फुलेही घालतात .यामुळे पाण्यास विशिष्ट स्वाद आणि वासही येतो.शरीराचा दाह ही कमी होतो .डोके उष्णतेने दुखत असेल तर याच्या फुलांचा गजरा मालवा किंवा याचा वास घेत राहावा.
3)मोगर्याची फुले घातलेले पाणी शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी .चेहरा धुण्यासाठीही वापरतात. पुष्प मेध्य, वाजीकरण कार्य करतात.
4)जुनाट जखम गळू फोड यावर मूळ व पानांच्या काढ्याचा उपयोग केल्यास जखम भरून येण्यास मदत होते. बेलीया मोगर्याचा अर्क लावल्याने गळू ,फोड जखम बरे होतात .
5) त्वचा विकारांवर पानांचा लेप केला जातो गर्भार पानात त्वचेवर खाज येते विशेष करून पोटाला ,स्तनांना त्यावर मोगर्याची फुले पाने व ज्येष्ठमध यांचे पाणी लावावे/लेप केल्यास विशेष फरक जाणवतो. नाकात माळीन होणे असे आपण बोली भाषेत म्हणतो .
6) कधी कधी नाकात बारीक पुळी येते आणि ती दुखते .नाकाला हलका स्पर्श हि सहन होत नाही त्यास माळीन असे म्हणतात. अश्या वेळेस मोगर्याच्या फुलाचा वास घेतल्यास विशेष उपयोग होताना दिसतो.
7) नेत्ररोगात फुलांचा लेप करतात तर त्याचा स्वरस मध्ये धुण्यासाठी वापरतात.तसेच वारंवार जुलाब होऊन आव व रक्त पडत असल्यास पानांचा स्वरस खडीसाखरे सोबत देतात .
8) स्रियांच्या मासिक धर्मात अनियमतता असल्यास पाने आणि फुले आर्तवजनन करतात. थोड्याफार फरक जाती आणि मोगर्याच्या गुणांमध्ये आहे .
ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांमध्ये याचे छान वर्णन केले आहे .
नाना गुंफली का मोकळी !
उणी न होती पर
वसंतागमीची वाटोळी !
मोगरी जैसी !!
म्हणून च त्यांच्या रचना मध्ये मोगार्यास विशेष स्थान
आहे ते पुढील गोष्टी मुळेच असावे असे वाटते ,मोगरा पावसाळ्यात उन्हाळ्यात हि फुलतो तो पावसामुळे अति उल्हासित हि होत नाही आणि उन्हामुळे कोमाजात हि नाही स्वत:फुलण्याचा आनंद घेऊन दुसर्याना गंधाचा आनंद देणे याहून दुसरे काय असेल म्हणून तर तो सांगत नसेल ना ,माझ्या वर्षभर माझ्यासारखे या फुलून दुसर्याला गंध देऊन आपले जीवन सुखी बनवा ...............!.

for more articles of swasthyadip e-ayurved diwali magazine
ReplyDeletevisit following site
www.sukhswasthya.com